चोपडा महाविद्यालयात शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थी बनले शिक्षक

chopada

चोपडा प्रतिनिधी । येथील म. गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच झालेल्या शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विषयाचे शिक्षक बनून अध्यापनाचे काम केले. तसेच शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमावेळी मान्यवरांच्याहस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाग्यश्री कुमावत हिने स्वागतगीत म्हटले. तसेच अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे म्हणाले की, शिस्तप्रिय, क्षमाशील व कर्तव्यदक्ष शिक्षकच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करुन राष्ट्र उभारणीच्या कामास हातभार लावत असतो. याचबरोबर पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय. पाटील व प्रा.एस.एन नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि अर्चना कोळी, महेश कोळी, वैभवी पाटील व गायत्री धनगर या विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल असलेली कृतज्ञता मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमास प्रा.एस.टी शिंदे, प्रा.ए.पी.लांडगे, प्रा.यू.वाय.पाटील व प्रा.अभिजीत पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पाटील तर आभारप्रदर्शन भाग्यश्री धनगर या विद्यार्थींनीनी केले.

Protected Content