जळगावातील केंद्रीय विद्यालयात वार्षिक क्रीडा उत्सव उत्साहात (व्हीडीओ)

जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलसचिव  डॉ. बी. व्ही. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते केंद्रीय विद्यालय जळगावच्या चोविसाव्या क्रीडा उत्सव प्रसंगी बोलत होते.

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एलसीबीचे पोलीस निरीक्षक बी. जी. रोहम तसेच एल एच पाटील इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शिल्पा मल्हारे हे कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम यांनी पाहुण्यांचे औपचारिक स्वागत केले. विद्यालयाचा राष्ट्रीय खेळाडू यश ईश्वर पाटील याने मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी क्रीडा प्रतिनिधी वैष्णवी पाटील सोबत सर्व खेळाडूंनी खेळ प्रतिज्ञा घेतली. विद्यालयाच्या चारही साधनांद्वारे मार्च पास करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक उग्रसेन सिंह यांनी वार्षिक क्रीडा रिपोर्ट सादर केला. इयत्ता सहावी तसेच नववीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर योग प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विवेक सहानी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content