धरणगाव पं.स. आरक्षण जाहीर; सभापतीपदी मुकुंदराव नन्नवरे यांची वर्णी लागणार

धरणगाव प्रतिनिधी । आज निघालेल्या पंचायत समिती आरक्षण सोडतीत धरणगाव पंचायत समितीवर सभापती जनरल पुरुष आरक्षण असून पाळधी गटातून निवडून आलेले शिवसेनेचे मुकुंदराव नन्नवरे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धरणगाव पंचायत समितीत एकूण सहा सदस्य संख्या असून पाच सदस्य शिवसेनेचे निवडून आलेले आहेत यापूर्वी सव्वा वर्ष महिला सभापती मंजुषा सचिन पवार होत्या व त्यानंतर सव्वा वर्ष सुरेखा हिरालाल पाटील यांना सभापती पदाची संधी मिळाली आहे. व उपसभापती म्हणून प्रेमराज पाटील व जनाबाई कोळी यांनी पदं भूषवली आहेत.
आज निघालेल्या पंचायत समिती आरक्षण सोडतीत धरणगाव पंचायत समितीवर सभापती जनरल पुरुष आरक्षण असून पाळधी गटातून निवडून आलेले शिवसेनेचे मुकुंदराव नन्नवरे हे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक असून पुरुष जनरल आरक्षण निघाल्याने सभापती पदी मुकुंदराव नन्नवरे यांचीच निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुकुंदराव नन्नवरे हे सर्वाधिक मताधिक्याने पाळधी गटातून निवडून आलेले सदस्य असून त्यांची सभापतीपदी निवड झाल्याने दलित समाजाला न्याय मिळणार असे मानले जाते. मुकुंदराव नन्नवरे हे आंबेडकरी समाजातील जिल्ह्यातील वजनदार नेता म्हणून ख्याती प्राप्त आहेत.

Protected Content