चोपडा महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी । येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात १० फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता श्रीमती अनुसयाताई साळुंखे सभागृह येथे ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आले असून अॅड. संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच योगेश सुभाषराव पाटील यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रमिला विश्वास पाटील (सचिव, जवाहर शिक्षण प्रसारक संस्था, धुळे), प्राचार्य डॉ एल.पी.देशमुख (सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ.उमवि, जळगाव) आणि प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी (माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ.उमवि, जळगाव) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी महाविद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.एस. हळपे व पर्यवेक्षक व्ही.वाय.पाटील यांनी केले आहे.

Protected Content