आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा – शिवसेनेची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या संशयित विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. हि आक्षेपार्ह पोस्ट व्हाटसअप या सोशल मिडिया माध्यमातून व्हायरल केल्यामुळे शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे. यामुळे अशा प्रवृत्ती विरुध्द कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, उपशहर प्रमुख संतोष धोबी, युवसेना शहराधिकारी सागर देवांग, आदिवासी तालुका प्रमुख हुसेन तडवी, अजहर खाटिक, सारंग बेहेरे, सुनील जोशी, शरद कोळी, महेंद्र चौधरी आदींची स्वाक्षरी आहे.

Protected Content