छत्रपती शिवरायांच्या नावाची रॉयल्टी खाऊ देणार नाही – छावा प्रमुख धनंजय जाधव

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीराजेंना अपक्ष परंतु महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी असती तर ही वेळ आली नसती, आतापर्यंत छत्रपतींचे ‘शिव’ वापरुन रॉयल्टी खाऊन देणार नसल्याची टीका छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी ट्वीट करीत केली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून पाठींबा द्यावा अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. परंतु त्यांना शिवबंधन अट घालत परत पाठवून कोल्हापुरातून संजय पवारांना उभे केले. परंतु भाजपचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार या कोल्हापूरच्या दोन उमेदवारांमध्ये निवडणूक झाली आणि पहिल्या पाच निकालानंतर सहाव्या जागेचा निकाल हाती आला आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक विजयी झाले.

छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेने अपक्ष म्हणून पाठींबा द्यावा, अशी अनेक आमदारांची सुप्त इच्छा होती. परंतु शिवसेनेने शब्द फिरवत शिवबंधन अट घातल्याने ते शक्य झाले नाही. आणि छत्रपती घराण्याचा अपमान सहन न झालेल्या आमदारांनी शिवसेना, वाचाळवीर संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली.शिवसेनेचे गर्वाचे घर खाली आले. अशा शब्दात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी आणि छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे.

Protected Content