चिनावल येथे ग्रामसभेत वाद; सागर भारंबेंनी केली सदस्यांच्या राजीनाम्यांची मागणी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर येथील ग्रामपंचायती ग्रामसभा आज दिनांक 24 डिसेंबर रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर घेण्यात आले सदर सभेत येथील वाघोदा रोड वरील देशी दारू दुकान स्थलांतरावरून खडा जंगी होऊन विद्यमान ग्रा. प .सदस्य व भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सागर भारंबे यांनी एका ग्रामपंचायत सदस्यांची राजीनामाची मागणी केल्याने एकच खडाजंगी पहावयास मिळाली.

येथील ग्रामपंचायती च्या लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत आज विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी अजेंड्या वरील विषय घेण्याआधी ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांनी वाघोदा रोडवरील देशी दारू दुकान स्थलांतरित कसे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला यावेळी एकच गोंधळ होऊन मागील ग्रामसभेत हे दुकान स्थलांतराला सर्वांचा एकमताने विरोध असताना चक्क एका ग्रामपंचायत सदस्याच्या मालमत्तेतच हे दुकान स्थलांतरित झाल्याने चिनावल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर भारंबे यांनी या सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी केली या मागणीला उपस्थित ग्रामस्थांनी लावून धरल्याने बराच वेळ सभेत खडा जंगी सुरू होते शेवटी या परिसरात असलेल्या सर्व दारु दुकान गावाबाहेर स्थलांतरित करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला .

या ग्रामसभेत ग्रामपंचायत ग्रामसभा अजेंड्यावरील सर्व विषय वाचून चर्चा करण्यात आली सदर चर्चेत विविध विषयांवर सर्व स्तरीय ग्रामस्थांनी सहभाग घेऊन सभा चक्क तीन तास खिळवून ठेवली सदर वेळी ग्रामसभेत असलेल्या रोजगार सेवक भरती , तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेले त्यांचे विम्याचे पैसे सुद्धा कंपनीकडे भरले गेलेले नसल्याने या कर्मचाऱ्यांनी ते पैसे त्वरित भरण्याची मागणी यावेळी केली सदर कर्मचाऱ्यांचे काही बरे वाईट झाल्यास याला कोण जबाबदार राहील असे महिला सफाई कामगारांनी या सभेत बोलताना म्हटले या वेळी बरं ्यच विषयावर बरीच गाजला यावेळी ग्रामस्थ सर्व सागर भारंबे, जयेश इंगळे, संजय भालेराव सर, विनोद भालेराव, संतोष भालेराव अविनाश पाटील मनोज फालक, भास्कर भिरुड, चंद्रकांत भंगाळे व ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला आज झालेली ग्रामसभा खूपच वादळी झाल्याने सरपंच सौ ज्योती भालेराव यांनी विकास कामांवर सुद्धा चर्चा करा असे आवाहन केले.

सदर ग्रामसभा दहा वाजता सुरू होऊन तब्बल तीन तास म्हणजे एक वाजेपर्यंत चालली सदर वेळी ग्रामविकास अधिकारी कैलास भगत यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले तसेच विविध विषयांवर उपाय माहिती दिली मात्र सदर सभेत दारू दुकान स्थलांतराचा विषय गाजल्याने संपूर्ण दिवसभर ही चर्चा होती सदर देशी दारू दुकान स्थलांतरासाठी मागील ग्रामसभेत नाम मंजुरी होऊ नये त्या दुकानाचे स्थलांतर झालेच कसे व तेही चक्क ग्रामपंचायत सदस्याच्या मालमत्तेत यावरून ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य सागर भारंबे व ग्रामस्थांनी रोष व्यक्त केल्याने व सदर मालमत्ता धारक कुटुंबातील असलेल्या ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा देण्याची मागणी केली यानंतर ग्रामसभेतसदर दारूचे सर्व दुकाने गावबाहेर स्थलांतर करण्याचा ठराव या ग्रामसभेत करण्यात आला सदर वेळी लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील निलेश नेमाडे,ग्राम विकास अधिकारी कैलास भगत ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर देशी दारू दुकान स्थलांतराला स्थानिक ग्रामपंचायत स्थानिक पोलीस स्टेशन जळगाव जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारल्यावरही आयुक्त उत्पादन शुक्ल यांनी परवानगी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे मात्र यामुळे गावात काही वाद उद्भवल्यास संबंधित आयुक्त जबाबदार राहणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहे .

Protected Content