*वरणगाव दत्तात्रय गुरव |* नव्याने काम पूर्ण होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा फुलगाव नजीक हून गेला आहे, त्यामुळे फुलगाव नजीक राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून वारंवार महामार्ग प्रशासनाकडे निवेदन देऊनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्यामुळे आज फुलगांवकरांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत रास्तारोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
भुसावळ तालुक्यातील फुलगाव हे राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याने अनेक समस्यांना या गावातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे नाहीत, महामार्गालगत गटारी नाहीत, रेल्वे ब्रिज असल्यामुळे त्या ब्रिज खालून छोटा पूल असल्याने वाहतुकीला नेहमीच अडथळा होत आहे, अशा अनेक समस्यांना या गावातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला निवेदन दिली, तरी देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने आज फुलगावकरांनी युवा स्वाभिमान पार्टी बरोबर आज फुलगाव येथील रेल्वे ब्रिज लगत रस्ता रोखून धरला. या रास्तारोको आंदोलनाने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलन करत्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी दिली. पोलिसांच्या मदतीने हे आंदोलन आटोक्यात घेण्यात आले व पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1464750533986459