‘ती’ बनणार उत्तराखंडची एका दिवसाची मुख्यमंत्री

 

हरिद्वार, वृत्तसंस्था । राष्ट्रीय कन्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर उद्या २४ जानेवारी रोजी उत्तराखंडमधील हरिद्वारची सृष्टी गोस्वामी हिला ही संधी प्राप्त झाली आहे.

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या मंजुरीनंतर सृष्टी एका दिवसाची मुख्यमंत्री बनणार आहे. देशामध्ये ही अशी घटना पहिल्यांदा घडत आहे की, मुख्यमंत्री असताना देखील कुणीतरी एका दिवसाचा मुख्यमंत्री बनणार आहे. यादिवशी हरिद्वारच्या बहादुराबाद ब्लॉकमधील दौलतपूर गावाचे नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाणार आहे. सृष्टी गोस्वामी कन्या दिवसानिमित्त एकदिवसीय मुख्यमंत्री होणार आहे. यावेळी सृष्टी एक मुख्यमंत्री म्हणून विकास कामांचा आढावा घेणार आहे. शिवाय १२ विभागातील अधिकारी त्यांच्या विभागातील योजनांबाबतचे ५-५ मिनिटांचे प्रेझेंटेशन तिच्यासमोर करतील.

सृष्टीचे वडील प्रवीण पुरी दौलतपुरात किराणा दुकान चालवतात, तर सृष्टीची आई सुधा गोस्वामी गृहिणी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी २०१८ मध्ये बाल विधानसभा संघटनेत बालिका आमदार म्हणूनही सृष्टी गोस्वामीची निवड झाली होती. सृष्टीचे वडील प्रवीण पुरी म्हणाले की, आज त्यांना खूप अभिमान वाटत आहे की त्यांची मुलगी अशा ठिकाणी पोहोचली आहे जिथे अनेक लोकांनी पोहोचण्याचे स्वप्न पाहिले आहे. असे संपूर्ण देशात पहिल्यांदाच होत आहे की, एका दिवसाची का होईना माझी मुलगी मुख्यमंत्री होणार आहे.

Protected Content