आकाश महालपूरे ठरला यंदाचा “संजीवनी युवा काव्य पुरस्काराचा मानकरी”

 

पाचोरा, प्रतिनिधी । अहमदनगर जिल्ह्यातील सर्वोच्च मानला जाणारा “संजीवनी युवा काव्य पुरस्कार” गोंदेगावचे प्रसिद्ध लेखक आकाश दिपक महालपूरे यांना जाहीर करण्यात आला आहे.

संगमनेर येथे रविवारी (दि.३१ जानेवारी) झालेल्या संजीवनी पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत आकाश महालपूरे यांना “संजीवनी युवा काव्य पुरस्कार” प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तिसऱ्या वर्षातील संजीवनी काव्य पुरस्कारासाठी आकाश महालपूरे यांची निवड करण्यात आली. आकाश महालपूरे यांनी संजीवनी फांऊडेशनच्या संपूर्ण जीवनकार्यावर सादर केलेल्या काव्यधारेतून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. याआधीही त्यांना साहित्यातील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच आकाश महालपूरे यांना यंदाचा “संजीवनी युवा काव्य पुरस्कार” जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Protected Content