वीज खासगीकरणाच्या विरोधात एक दिवसाचा संप

जळगाव प्रतिनिधी । वीज उद्योगाच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध तसेच अन्य विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने सरकारच्या धोरणाविरुद्ध ३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.

वीज उद्योगाच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध व वीज कायदा २०२१ रद्द करावा या व अन्य विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने सरकारच्या धोरणाविरुद्ध ३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. राज्यभरात हा संप केला जाणार आहे.

विद्युत बिल व स्टॅन्डर्ड बिडिंग डॉक्युमेंट रद्द करावे, अस्तित्वात असलेल्या सर्व फ्रॅन्चाइझी रद्द कराव्यात, केंद्रशासित प्रदेशांतील खासगीकरणाची प्रक्रिया बंद करावी. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. सक्तीची सेवानिवृत्ती योजनेचे प्रावधान रद्द करावे. फिक्स टर्म एम्प्लायमेंट नवीन ठेकेदारी पद्धत रद्द करावी या मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. या संपाबरोबरच विविध कर्मचारी संघटना परिमंडळ कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत धरणे आंदोलन करणार आहेत, असे आवाहन वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा आणि परिमंडळ सचिव वीरेंद्रसिंग पाटील यांनी कळवले आहे.

Protected Content