शुभ वार्ता : २२ रूग्णांनी केली कोरोनावर मात; टाळ्यांच्या गजरात निरोप

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणातील अल्पसंख्यांक वसतीगृहात असलेल्या कोविड कक्षातील २२ कोरोना रुग्ण संपूर्ण बरे झाल्याने आज सर्वांना खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

गेल्या एकवीस दिवसांपासून कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण बरे होऊन घरी परतणार असल्याने त्यांना खासदार उन्मेश दादा पाटील, आमदार स्मिताताई वाघ,महापौर भारतीताई सोनवणे यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. या रुग्णांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून उपचाराबद्दल माहिती घेतली आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील १८, भोकर येथील ३ तर विटनेर येथील १ रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.ते म्हणाले आमची अतिशय चांगली व्यवस्था ठेवली गेली आणि वेळोवेळी औषधोपचार बाबत आमची काळजी घेतली गेली. तसेच महापौर भारती सोनवणे ,माजी नगराध्यक्ष कैलास आप्पा सोनवणे यांनी दररोज फोन करून आमच्या जेवणाची चौकशी केली. या रुग्णांनी संबंधित डॉकटर, नर्सेस, सफाई कामगार याचे देखील आभार मानले. यावेळी आमदार स्मिताताई वाघ, महापौर भारती सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी,स्थायी समिती सभापती अ‍ॅड. सुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे, चेतन वाणी, गिरीश बरर्‍हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

निरोप देताना खासदारांसह उपस्थितीत मान्यवरांनी टाळ्या वाजवून या सर्वांना निरोप दिला यावेळी या रुग्णांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. याप्रसंगी ररूग्णांच्या नातेवाईकांसह डॉ. नेहा भारंबे,डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. पल्लवी नारखेडे, हेमलता नेवे, डॉ. सायली पवार यांच्या सह कोविड केअर सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content