यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरगुती जेवणात बाजरी, ज्वारीची भाकरी खाणारे तृणधान्याचा वापर फारसा करत नसल्याने, शरीरास लागणारे आवश्यक घटकाचे अभावी विविध आजार तोंड काढत आहेत. ही तृणधान्य अत्यंत पौष्टिक असल्याने शासनाने सन 2023 आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. वर्षभरात ऋतू निहाय बाजरी, ज्वारी, राजगिरा, राळा, नाचणी, वरई या तृण धान्याचा आहारात वापर करावा, यासाठी कृषी विभागास विविध कार्यक्रमामार्फत जनजागृती करण्याचे आदेश दिले असून या तृणधान्याचा वापर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करून आरोग्य निरोगी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामीण भागातील उपहारगृहापासून तर पंचतारांकित हॉटेल्स मध्ये बाजरी ज्वारी दुर्मिळ झाला असल्याने विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे शासनाच्या वतीने तृणधान्य अंतर्गत बाजरी, ज्वारी , राजगिरा , राळा, वरई , नाचणी ,या धान्याचा वापर नागरिकांनी करावा यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमधून रॅली विविध घोषवाक्य असे कार्यक्रम घेण्यासंदर्भात सूचित केले आहे त्यासाठी सन 2023 आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे . यामध्ये ऋतुनिहाय व व तृणधान्याच्या विविध घटकानुसार जानेवारी महिन्यात बाजरी, फेब्रुवारी -ज्वारी, आगस्ट- राजगिरा , सप्टेंबर – राळा ,ऑक्टोबर -वरई, तर डिसेंबर मध्ये नाचणीचा वापर नागरिकांनी करावा यासाठी कृषी विभागाकडून एक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
मानवी शरीरास जास्तीत जास्त बाजरी हे धान्य ऊर्जा देणारे तृणधान्य आहेत तृणधान्य कोलेस्टार चे प्रमाण नियमित ठेवते तृणधान्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम ,उत्तम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो बाजरीमध्ये सल्फर युक्त, अमिनो आम्ल, असल्याने लहान मुले गर्भवती मातांसाठी उपयुक्त धान्य म्हणून आहे. बाजरीमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तृणधान्यात अ जीवनसत्व पुरेशा प्रमाणात असून तंतुमय पदार्थ जास्त आहेत तृणधान्य हृदयास सक्षम बनवते, मधुमेह, कॅन्सर रोधक आहे यामुळे हाडे मजबूत होतात त्वचा चकाकते ,केस वाढ होते मानवी शरीरास तृणधान्य पुरेशा प्रमाणात ऊर्जा देत असल्याचे शासन परिपत्रकात म्हटले आहे १०० ग्रॅम बाजरीमध्ये प्रथिने १२ ग्रॅम स्निग्ध पदार्थ ५ग्रॅम जास्त ३० पीपीएम मॅग्नेशियम २८ ग्रॅम फॉस्फरस, २४२ मी. ग्रॅम,पिष्टमय पदार्थ ६७मी .ग्रॅम,लोह ६० पीपीएम कॅल्शियम ४२ मी ग्रॅम, व्हिटॅमिन बी ६.२टक्के , एवढे घटक असल्याने तृणधान्याचा वापर आहारात करावा हा शासनाचा प्रयत्न आहे जेणेकरून विविध आजारावर आळा बसेल अशी यावल तालुका प्रभारी कृषी अधिकारी सागर शिनगारे यांनी सांगितले.
विविध पदार्थाच्या माध्यमातून तृणधान्याची सेवन करता येते त्यात बाजरीची भाकरी बाजरीची खिचडी चुरमा बाजरीचे उंडे उपमा यासह बेकरी पदार्थांमध्ये बिस्किट्स नानकटाई खारी टोस्ट बाजरीचा पिझ्झा इत्यादी पदार्थाच्या माध्यमातूनही या तृणधान्याचे सेवन करता येते. नागरिकांना आपापल्या परीने कोणत्याही माध्यमातून सेवन करून रक्तदाब ब मधुमेह या आजारावर आळा घालून शरीरातील विविध घटकासह रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी तृणधान्याचा ऋतू निहाय आहारात वापर करावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.