कोरोना विषाणू प्रादुर्भाव जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष

जळगाव (प्रतिनिधी) ‘कोरोना’ विषाणूवर उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.

 

चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार धर्तीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0257-2223180/2217183 असा आहे. नागरिकांनी आपापल्या घरीच थांबून ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

Protected Content