बंजारा बिग्रेडच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मांडवे दीगर येथील गोर बंजारा समाजाच्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी बंजारा बिग्रेडच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयावर गुरूवार १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता धडक मोर्चा काढण्यात आला.

भुसावळ तालुक्यातील मांडवे दिगर येथील सुमारे साडेसात हजार शेतकऱ्यांचे २ हजार १०० एकर जमीन देवस्थानच्या नावे करण्यात आली आहे. त्यामुळे या जमिनीची खरेदी विक्री करता येत नसून ही शेतजमीन शेतकऱ्याच्या नावे वर्ग २ वरून वर्ग १ मध्ये शेतकऱ्याच्या नावे करण्यात यावी. त्याच बरोबर लिहे दिगर येथील शेतकऱ्यांच्या संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, चाळीसगाव तालुक्यातील बोडरे शिवापूर या तांड्यातील सोलर प्रकल्प आंदोलन करतांना वयोवृद्ध व पीडीत शेतकरी व बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी बंजारा बिग्रेड या संघटनेच्यावतीने गुरूवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जामनेर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बंजारा बिग्रेड राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर शहरातील महाराणा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येवून नायब तहसीलदार यांना विविध मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले. येणाऱ्या काळात काळात माडवे बुद्रुक व लिहे दिगर येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर काळात बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या धडक मोर्चात बंजारा बिग्रेड राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड व बंजारा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content