बोरावल गेट परिसरात आदिवासी चिमूकल्यांना मनसेतर्फे आहार वाटप

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्याहस्ते शहरातील बोरावल गेट परिसरातील आदिवासी वस्तीतील लहान चिमूकल्या मुलांसोबत सकस आहार अंडी केळी बिस्किट काजू बदाम असा पोस्टीक आहार वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज १४ जुन ठाकरे रोजी वाढदिवस मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मनसेचे तालुका उपाध्यक्ष शाम पवार, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष गौरव कोळी, विपुल येवले, प्रतीक येवले, विभागाध्यक्ष आबिद कच्छी, राज शिर्के, आकाश चोपडे, वैभव दांडेकर, खुशाल चौधरी, ओम लोणारी ,गोलू भोई यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रथम या आदीवासी वस्तीवरील गोरगरीब कुटुंबांतील चिमुकल्या लहान मुलांना सकस आहार वाटप करण्यात आल्याने मुलांच्या कुटुंबांनी मनसे चेरावेर लोकसभा जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर व त्यांच्या सैनिकांचे मनपुर्वक आभार मानले.

Protected Content