अवघ्या पाच रुपयाच्या वादातून रिक्षाचालकाचा खून !

 

मुंबई (वृत्तसंस्था) अवघ्या पाच रुपयाच्या वादातून बोरिवली परिसरात एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

रिक्षाचालक रामदुलार सरजू यादव (६८) हे मंगळवारी सायंकाळी सीएनजी स्टेशनवर रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेले होते. २०५ रुपये गॅस भरल्यानंतर यादव यांनी गॅस स्टेशनच्या अटेंडंटला ५०० रुपयांची नोट दिली. त्याने २९५ रुपये परत करण्याऐवजी ५ रुपये कमी दिले. यावर यादव यांनी आपले शिल्लक असलेले ५ रुपये मागितले. त्यावर पंपावरील कर्मचारी संतोष जाधवने यादव व त्यांच्या मुलाशी गैरवर्तणूक केली. शाब्दिक वाद वाढल्यनंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी दोघं बाप बेट्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. यात वयोवृद्ध यादव हे बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Protected Content