Home क्राईम गणेश वाडी परिसरातून प्रौढ व्यक्ती बेपत्ता

गणेश वाडी परिसरातून प्रौढ व्यक्ती बेपत्ता

0
110

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेश वाडी परिसरातून ५२ वर्षीय व्यक्ती हे घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दिनेश मधुकर वाणी (वय-५२) रा. गणेश वाडी, जळगाव असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, दिनेश वाणी हे आपल्या परिवारासह गणेशवाडी परिसरात वास्तव्याला आहे. बुधवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांनी घरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही.

अखेर त्यांचे भाऊ जयंत वाणी यांनी गुरूवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.


Protected Content

Play sound