अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी १८ हजार लसीकरणाचा उच्चांक

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १८ हजार डोस उपलब्ध करून शहरांतील सानेगुरुजी शाळेत व ग्रामिण भागात आठ गावात महा लसीकरण शिबिर आयोजित केल्याने १८ हजार लसीकरणाचा मोठा उच्चांक गाठला गेला आहे.

सदर शिबीर सानेगुरुजी विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणात सकाळी 9 वाजेपासून सुरू झाले,शहरासाठी 10 हजार तर ग्रामिण भागात जवळपास आठ हजार डोस आमदारांनी उपलब्ध केले होते,विशेष म्हणजे सदर शिबीर 18 प्लस गटा तील सर्व व्यक्तींसाठी खुले होते याठिकाणी कोव्हीशिल्ड लसीचे डोस सर्वाना देण्यात आले,विशेष म्हणजे सानेगुरुजी शाळेतील लसीकरण केंद्रावर उन्हापासून बचावासाठी मंडप,पिण्यासाठी पाणी,गर्दी होऊ नये यासाठी आठ खोल्यांमध्ये लसीकरणाची सोय हे सर्व आमदारांनी स्वतः तपासल्यानंतर आमदारांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी मंचावर आ. अनिलं पाटील, मार्केटच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पातोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, ग्रामिण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, नगरपालिका रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विलास महाजन, नर्सिंग स्टाफच्या सुवार्ता वळवी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तालुका कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, रंजना देशमुख यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी लसीच्या उपलब्धतेबद्दल प्रशासनाचे आभार मानत ४ ऑक्टोबर पासून शाळा व दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू होत असल्याने विद्यार्थी तसेच वंचित राहिलेले नागरिक, दिव्यांग, गरोदर माता, शिक्षक वृंद आदींचे लसीकरण करण्यासाठी डॉक्टरांशी चर्चा करून हा मोठा लसीकरण कॅम्प घेतला असल्याचे स्पष्ट केले. आज जवळपास १७ ते १८ हजार डोस तालुक्यात उपलब्ध केले असून ग्रामिण भागात ८ ठिकाण तर सानेगुरुजीतील केंद्रावर  १० हजार लस उपलब्ध केल्या आहेत अजून लस लागल्यात तर लागलीच गाडी जाईल आणि लागतील तेवढ्या लस उपलब्ध केल्या जातील अशी ग्वाही आमदारांनी दिली.

 

शिबिराचे उत्कृष्ट नियोजन

सदर महा शिबिराची जोरदार तयारी आमदारांच्या टिमने तीन दिवसांपासून सुरू केली होती. मागेल त्याला लस हेच आमदारांचे उद्दिष्ट होते. तब्बल आठ खोल्यांमध्ये लसीकरण होत असल्याने महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, गरोदर माता, दिव्यांग व्यक्ती यांचेही शांततेत व नियोजनबद्ध लसीकरण झाले. याठिकाणी कोव्हीशिल्डचा पहिला आणि दुसरा दोन्ही डोस दिले गेलेत. विशेष म्हणजे याठिकाणी लस घेण्यासाठी टोकन अथवा ऑनलाइन रजिस्ट्रेशन अशी कोणतीही झंजट नसल्याने नागरिक व महिला भगिनींना रांगेत उभे राहील्यानंतर लागलीच लस मिळाली. आठ खोल्यांमुळे एका व्यक्तीला केवळ २० ते २५ मिनिटं फक्त रांगेत उभे राहिल्यानंतर लागलीच लस मिळत असल्याने प्रत्येक जण लस टोचून अतिशय समाधानाच्या भावाने केंद्रावरून बाहेर पडत होता,दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास चार ते पाच हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते.

 

आमदार अखेरपर्यंत तळ ठोकून 

लसीकरण शिबिर यशस्वी होण्यासाठी आमदार पाटील हे स्वतः सकाळी 9 वाजेपासून शिबीर संपेपर्यंत लसीकरण केंद्रावर ठाण मांडून असल्याने कोणताही गोंधळ उडाला नाही,यादरम्यान आमदार ग्रामिण भागाचाही आढावा घेत होते,लस टोचून जाणारा प्रत्येक व्यक्ती व महिला भगिनी जाताना आमदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर आयोजनाबद्दल विशेष आभार व्यक्त करत होते.

 

ग्रामिण भागात येथे झाले लसीकरण

ग्रामिण भागात कुर्हे बु,देवगाव देवळी,गांधली,निंभोरा,झाडी, नगाव,कलमसरे,सडावन,फाफोरे याठिकाणी लसीकरण करण्यात आले,यापुढे ज्या गावात लसीकरण अपूर्ण असेल त्याठिकाणचा आढावा घेऊन डॉक्टर आणि प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर टप्प्याटप्प्याने कॅम्प लावून लसीकरण केले जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले

आमदारांच्या सहयोगाने लवकरच पूर्ण होणार लसीकरणाचे टार्गेट

आमदार अनिल पाटलांनी सुरवातीपासून जास्तीत जास्त लस आपल्या तालुक्यात व मतदारसंघात कश्या उपलब्ध होतील असा प्रयत्न केला असल्याने बहुतांश जणांचे लसीकरण झाले असून आता त्यात या शिबीरामुळे 18 हजार जणांच्या लसीकरणाची भर पडली आहे,यापुढे देखील लसीकरणाचे टार्गेट वेगाने पूर्ण करण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नाने लसीकरणाचा ओघ सतत सुरू राहणार आहे त्यामुळे आपला मतदारसंघ लवकरच 100 टक्के लसीकरण करण्यात अव्वल झालेला दिसेल असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.

केवळ लसच नव्हे तर सुविधाही दिली

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की आमदारांनी केवळ फोटो सेशन व प्रसिद्धी हा उद्देश न ठेवता याठिकाणी मंडप,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरेसे स्वयंसेवक याची पुरेशी व्यवस्था ठेवली,एवढेच काय कुणी जेष्ठ अथवा आबालवृद्ध असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असेल त्यांना आमदार स्वतः भेटून लस टोचण्यासाठी आतमध्ये घेऊन जात होते परिणामी सर्व स्वयंसेवक देखील याचपद्धतीने सेवा देत होते यामुळे खऱ्या अर्थाने आमदारांनी जनतेची सेवाच यानिमित्ताने केली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे सेवेचे धोरण आमच्या आमदारांनी जपले असल्याची भावना सचिन पाटील यांनी व्यक्त केली.

सदर शिबिरासाठी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी वृंदासह राष्ट्रवादी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचे अनमोल सहकार्य लाभले यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,शहराध्यक्ष मनोज पाटील,मार्केटचे संचालक संभाजी पाटील,विजय प्रभाकर पाटील, नगरसेवक राजेश पाटील, दीपक पाटील,ऍड.यज्ञेश्वर पाटील, नरेंद्र संदानशिव, माजी नगरसेवक बाळराजे पाटील, संदीप घोरपडे, बाळासाहेब शिसोदे, बी आर बोरसे,प स सदस्य प्रविण पाटील,निवृत्ती बागुल,विनोद जाधव, शिवाजीराव पाटील,देविदास देसले,विजय जैन,इम्रान खाटिक, प्रा श्याम पवार, सौ.कविता पवार, सौ योजना पाटील, आशा चावरिया, सौ.मंदाकिनी पाटील, सौ.भारती शिंदे, अलका पवार, आशा शिंदे,   माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, ए टी पाटील, गौरवनाना पाटील, राजू देशमुख, भाईदास महाजन, सुनील शिंपी, के आर शेख, मिलिंद पाटील, गणेश भामरे, सचिन बेहरे, ज्ञानेश्वर कुमावत, बाळू पाटील, राहुल गोत्राळ, हिंमत पाटील,गोविंदा पाटील,मनोज पाटील, नितीन भदाणे, श्रीनाथ पाटील, पंकज सनेर, यतीश पाटील, मुन्ना पवार, मनोज बोरसे, शुभम बोरसे, विनोद सोनवणे, अमोल पाटील, निनाद शिसोदे, अनिरुद्ध शिसोदे, उमेश सोनार, गौरव पाटील, सनी गायकवाड, प्रफुल संदानशिव, राज पाटील, शत्रूग्न पाटील, भूषण भदाणे, सागर पाटील, सागर सोनार, वाल्मिक पाटील, प्रणव पाटील, फोटोग्राफर चेतन बहारे यासह ग्रामीण रुग्णालयांचा स्टाफ ज्योती बकले, अर्चना खांडलकर, सपना लांडगे, दीपक धनगर, प्रा.विशाल गावित, प्रा.किरण गावित, मनोहर पाटील,  जितू कढरे, निलेश भुरट, ज्ञानेश्वर मिस्त्री, सागर पाटील यांच्या सह नगरपालिका दवाखान्याच्या सिस्टर योगिता कुलकर्णी यांच्या त्याचा स्टाफ, आशा वर्कर्स व सिस्टर्स यांच्या सह नगरसेवक, पं स आणि जि प सदस्य, मार्केट चे संचालक आदींचे सहकार्य लाभले. सायंकाळी उशिरापर्यंत हे शिबीर सुरू होते.लसीकरण केंद्रावर पोलीस यंत्रणेचेही सहकार्य लाभले.

Protected Content