अमळनेरकरांनी बाहेराच्यांना नाकारले-आमदार अनिल पाटील

amalner satkar

अमळनेर प्रतिनिधी । बाहेरच्यांना अमळनेरकरांनी नाकारले असून मतदारसंघाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. ते सर्वपक्षीय नागरी सोहळ्यातील सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.

मराठा मंगल कार्यालयात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यी अ‍ॅड.रवींद्र पाटील, तर माजी मंत्री अरुण गुजराथी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय, कार्यक्रमाला नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील, भाजपचे शाम अहिरे, शिवसेनेचे विजय पाटील, उमेश पाटील, रिता बाविस्कर, अ‍ॅड.एस.एस.ब्रम्हे, डॉ.अनिल शिंदे, प्रा.अशोक पवार, प्रा.प्रकाश जाधव, चंद्रकांत पाटील, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, रंजना देशमुख, सुभाष चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, योजना पाटील, आशा चावरीया, अलका पवार, कविता पवार, बापू कोठावदे, नाना चौधरी, सचिन पाटील, प्रा.सुरेश पाटील, शिवाजी पाटील, बाळू पाटील, गौरव पाटील उपस्थित होते.

प्रास्ताविक अनिल सिसोदे यांनी केले. यानंतर माजी मंत्री गुजराथी यांनी कार्यक्षमता व गुण पाहून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार अनिल पाटील यांना अमळनेरात हेरल्याचे सांगितले. रवींद्र पाटील, तिलोत्तमा पाटील, मुन्ना शर्मा, शाम अहिरे, विजय पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, काँग्रेसचे मुन्ना शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कदम, वसुंधरा लांडगे यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना आमदार अनिल पाटील यांनी, अमळनेरकरांनी बाहेरच्या उमेदरावाला नाकारले असल्याचे सांगितले. आपल्या विजयात दिवंगत उदय वाघ यांचा मोलाचा वाटा असला तरी ते आज नसल्याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. ते म्हणाले की, मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी आपण कटीबध्द आहोत. पाडळसरे धरण पाच वर्षात पूर्ण करण्यास प्राधान्य असेल. शहरातील दगडी दरवाजा, वाहतूक प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

Protected Content