डॉन रवी पुजारी अटकेत; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

ravi pujari

मुंबई । कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगल या आफ्रिकन देशात अटक करण्यात आली असून त्याला प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण करून भारतात आणले जाणार आहे.

रवी पुजारीला २१ जानेवारी २०१९ रोजी सेनेगलची राजधानी डकारमधील एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर जून २०१९ मध्ये तो फरार झाला होता. आता मात्र त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुजारीला भारताच्या हवाली करण्यात आले आहे. परतीच्या विमानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारीच पुजारीला भारतात आणलं जाईल. सुरुवातीला तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात असेल. भारतासाठी हे मोठे यश मानले जात आहे.
रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावाने वावरत होता. त्याच्याकडे बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट त्याच्याकडे होता. रवी पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी व अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Protected Content