इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले येथे बंद

indurikar maharaj

अकोले, जिल्हा नगर । निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुक्यात बंद पाळण्यात येत असून यात वारकरी संप्रदायासह विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या काही वक्तव्यांनी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी अडून बसलेल्या आहेत. दरम्यान, एकीकडे महाराजांवर आरोप होत असतांना दुसरीकडे त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा देखील मिळत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आज नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. वारकरी संप्रदायासह विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हा संप पुकारण्यात आला असून यात बाजारपेठ बंद राहणार आहे. दरम्यान, एका सभेचे आयोजन करण्यात आले असून यात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना समर्थन देण्यात येणार आहे.

Protected Content