अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय रोबोथलॉन व विज्ञान प्रदर्शन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय व ओरायन स्टेट बोर्ड जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय रोबोथलॉन व विज्ञान प्रदर्शन – २०२० प्रदर्शनाचे आयोजन १८ व १९ जानेवारी २०२० रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन ओरियन शाळेचे प्राचार्य संदीप साठे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष केसीई अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा.डॉ.के.पी.राणे होते. एमबीए विभाग प्रमुख प्रा. संजय सुगंधी,डीकेएसडीसीचे प्रा.एस.पी.पावडे, अकॅडेमिक डीन प्रा.डॉ.प्रज्ञा विखार यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात शारदादेवी स्तवनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष

केसीई अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा.डॉ.के.पी.राणे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि स्पर्धेतील यश किंवा अपयश महत्वाचे नसून आपल्या विविध विज्ञान कलाकृती सादर करण्याचा आत्मविश्वास महत्वाचा असतो. या स्पर्धेसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, भुसावळ, जामनेर व तसेच इतर जिल्ह्यातील शाळांमधून एकूण ११० विदयार्थ्यांनी त्यांचे वैज्ञानिक संशोधनात्मक साहित्य प्रदर्शनात मांडले होते व तसेच स्वयंचलित हुमोनाइड रोबोटने विविध प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांना आकर्षित केले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शासकीय तंत्रनिकेतनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ .शुभांगी पाटील व महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा.कल्पेश महाजन यांनी काम पहिले.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव व ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ यांना विभागून देण्यात आले. तसेच व्दितीय पारितोषिक ओरियन इंग्लिश मेडियम स्कूल,जळगाव व न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर यांना विभागून देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मुरलीधर चौधरी यांनी केले व तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. के. बी. पाटील, प्रा. एस. एम. जांभईकर, प्रा.निलेश पाटील, प्रा.रजनी गोजरेकर, प्रा.एस.आर.कुमावत, प्रा.डॉ.एस.आर.पाटील व सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेतरकर्मचारी, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content