खा. पाटील यांनी दिशाभूल करू नये ; महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन

 

जळगाव, प्रतिनिधी । खासदार उन्मेष पाटील यांनी दिशाभूल करू नये, नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक काढून दादू कोंडदेव बद्दल उदो उदो करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्यात आला आहे याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे.

खासदार उन्मेष पाटील यांचे फोटो व भाजप चिन्ह असलेल्या प्रसिद्धीपत्रकात दादोजी कोंडदेव नावाच्या व्यक्तीला शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक व मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन मिळणे हे पूर्णपणे अनैतिहासिक असून या गोष्टीचा जाहीर निषेध करत करण्यात आला आहे. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते तर ते शहाजीराजांची नियुक्त केलेले अनेक कर्मचारी पैकी एक होते. ही बाब वारंवार सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्र शासन देत असलेल्या दादोजी कोंडदेव आदर्श शिक्षक पुरस्कार समितीस ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी हा पुरस्कार केवळ आदर्श शिक्षक पुरस्कार नावाने शिल्लक ठेवलेला आहे. शासकीय पातळीवर हा त्याचा एक पुरावाच आहे. शहाजीराजांनी जयराम पिंडे नावाच्या कवीकडून ‘राधामाधव विलासचंपू’ नावाचा ग्रंथ लिहून घेतला होता. त्या ग्रंथात बाल शिवबाला शिकवण्यासाठी ६३ शिक्षकांची नेमणूक केली असे सांगितले आहे. परंतु, या ६३ शिक्षकांच्या यादीमध्ये दादोजी कोंडदेव यांचे नाव नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक केल्यानंतर स्वतः कवी परमानंद या कवीची नेमणूक करून शिवभारत नावाचा ग्रंथ लिहून घेतलेला आहे हा शिवाजी महाराजांच्या इतिहासाची एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. या ग्रंथात दादोजी कोंडदेव गुरु किंवा प्रेरणास्थान असल्याचा कुठलाही उल्लेख नाही. याउलट शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात म्हणजे राजारामांच्या काळात लिहिलेल्या सभासद बखरीमध्ये दादोजी कोंडदेव नावाचा शहाणा चौकस नोकर लोकनियुक्त केल्याचा केवळ एक ओळीचा उल्लेख सापडतो. यावरून कोणते प्राथमिक व दर्जेदार ऐतिहासिक साधनात दादोजी कोंडदेव गुरु प्रेरणास्थान अथवा मार्गदर्शक असल्याचा उल्लेख नाही. यावरून या सर्व प्रकरणावर संबंधित तात्काळ जाहीर माफी न मागितल्यास जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील तसेच सचिव एडवोकेट कुणाल पवार यांनी दिला आहे.

Protected Content