अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) प्रख्यात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना माहित आहे, म्हणून आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे यावेळी प्रिया बेर्डे यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी प्रिया बेर्डे म्हणाल्या की, आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंत आणि तंत्रज्ञ यांना मोठी मदत राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादी काँग्रेसचेने ३ हजार लोक कलावंतांना प्रत्येकी ३००० रुपये मानधन दिले. नाट्य-चित्रपट क्षेत्रातही अनेक निर्माते दिग्दर्शक यांनी मदत केली आहे, तीही कोणताच गवगवा न करता. मला आपल्या कलाकार तंत्रज्ञ यांच्याविषयी तळमळ वाटते. राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगले काम करु शकेन. मी स्वतःला नेता म्हणणार नाही. कारण आम्ही सगळे जण एकत्र काम करणार आहोत. अभिनय सुरुच राहील, निर्माती म्हणूनही काम करत आहे, ते चालू ठेवेन,सेही प्रिया बेर्डे यांनी सांगितले. दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे जाऊन १६ वर्ष झाले परंतु ते आजही आमच्या मनात आहेत. त्यांचे कार्य आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहात, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांचा पक्षप्रवेश झाला.

Protected Content