नोकरांसमोर अपमान करतो म्हणून केला सख्या भावाचा खून !

 

ठाणे (वृत्तसंस्था) दुकानातील नोकरांसमोर अपमान करतो म्हणून अपमानित झाल्याच्या भावनेतून लहान भावाने सख्या मोठय़ा भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोपरीमध्ये उघडकीस आला आहे. महेश चावला (४८) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

 

कोपरी येथील गावदेवी मंदिर परिसरात महेश आणि अनिलचे मे. रतन सुपरमार्केट नावाचे एकमजली दुकान आहे. दुकानाच्या कारभारावरून महेश आणि अनिलमध्ये वारंवार वाद होत असे. यातून नोकरांसमोर अनिलला अपमानित व्हावे लागत होते. त्यामुळे अनिलने २ जुलैला सायंकाळी अभय अग्निहोत्री आणि शोबीत सिंह या नौकरांच्या मदतीने महेशच्या हत्येचा कट रचला. दुकानातील सीसीटीव्ही बंद करून अनिलने महेशच्या डोक्यात लोखंडी वस्तूने हल्ला करत त्याला ठार मारले. त्यानंतर शिडीवरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव पोलिसांसमोर रचला. मात्र, तपासात त्याचे हे बिंग फुटले. याप्रकरणी पोलीसांनी अनिल चावला (४५) आणि दुकानातील नोकर अभय अग्निहोत्री (१९), शोबीत सिंह (१९) यांना अटक केली आहे.

Protected Content