रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर उभारणीसाठी प्रशासनातर्फे चाचपणी

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील हायरीक्स कोरोना बाधित रुग्णाना ऑक्सिजन उपलब्ध व्हावे म्हणून रावेर ग्रामीण रुग्णालय कोरोना ऑक्सिजन सेंटर करण्याच्या विचाराधिन प्रशासन असून तर येथील दरोरोजची ओपीडी इतर ठिकाणी हलवण्याचा प्रशासन विचार करत आहे. आज रावेर शहरातील बंद पडलेल्या नगर पालिकेच्या जुन्या हॉस्पिटलची प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी पाहणी केली.

आज प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले कोरोना सोयी-सुविधांची आढावा घेण्यासाठी रावेर तालुक्यात आले होते. यावेळी हाय-रिक्स कोरोना बाधित पेशंटला ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यास त्यांना जळगाव हलवावे लागत आहे.म्हणून प्रांतधिकारी लोकवर्गणी म्हणून रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची पाईपलाइन बसवून सुमारे ६० पलंगावर व्हेंटीलेटर लावण्यात येणार आहे. तालुक्यातील हाय-रिक्स कोरोना पेशंट येथे एड्मिट करून येथेच त्यांना सुविधा उपलब्ध करण्याच्या विचारधिन प्रशानस आहे.

जनआरोग्यासाठी लोकवर्गणी गरजची; प्रांतधिकारी

रावेर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून त्यांना योग्य-सुविधा उपलब्ध व्हावे तालुक्यातील कोणीही ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये म्हणून जनआरोग्यासाठी तालुक्यातील दात्यांनी स्वयंस्फुर्तिने शासनाला मदत करण्याचे हात-हाक फैजपुरचे प्रांतधिकारी यांनी केले त्यांनी आज सरपंच संघटनेची बैठक घेऊन मदतीचे अवाहन केले

इतर रुग्णासाठी पर्यायी जागेची पाहणी

रावेर ग्रामीण रुग्णालय कोविड ऑक्सिजन सेंटर केल्यास येथील दरोरोजचे पेशंटच्या तपासणीसाठी प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले,तहसिलदार उषाराणी देवगुणे,मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी बसस्थानकासमोरील बंद पडलेल्या जुने पालिकेचे हॉस्पिटलची पाहणी केली.

 

Protected Content