कंदहार : वृत्तसंस्था । अफगाणिस्थानात वायू सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तालिबानला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं, वायू सेनेने शेबर्गन शहरात त्यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान सदस्यांचा खात्मा झाला.
अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले, वायु सेनेकडून त्यांच्या सभा व लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात २०० पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ल्यामुळे मोठ्यासंख्येने त्यांचा शस्त्रसाठा व दारूगोळा तसेच त्यांची १०० पेक्षा अधिक वाहन नष्ट झाली.”
जावजान प्रांताच्या शेबर्गन शहरातील तालिबानच्या जमावाला आज सायंकाळी बी-52 बॉम्बरने निशाणा बनवलं गेलं. अशी माहिती देखील अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्विटद्वारे दिली होती.
तालिबानच्या जमावाला शेबर्गन शहर, जोज्जान प्रांतात बी-52 द्वारे लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या वायुसेनेच्या हवाई हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असं अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्विट केलं आहे.
या अगोदर एका पाकिस्तानी दहशतवाद्यास गझनी प्रांतीय केंद्राबाहेरील भागात अफगाणिस्तानच्या कमांडो दलाकडून अटक करण्यात आली होती. त्याचा दहशतवादी कारवाया आणि नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभाग होता.