शेतीच्या वादातून एकावर कुऱ्हाडीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री येथे शेत जमिनीच्या वादातून एकावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पिंप्री येथील रहिवाशी सुधाकर जानकीराम सपकाळे हे आपल्या पत्नी व कुटुंबियांसह राहतात. काल शनिवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोरील चौकात गावातील बाळू अमृत सपकाळे हा उभा होता. त्यामुळे सुधाकर सपकाळे यांनी बाळू सपकाळे याला सांगितले की, तू माझ्या वडीलांच्या नावे असलेले शेतीचा व्यवहार आम्हाला न विचारता का केला व शेती कोणाला विकले’ असा विचारचा राग बाळू सपकाळे याला आल्याने ‘मला विचारू नका, तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, मुला पुन्हा विचारले तर याद राखा’ अशी धमकी दिली. असा वाद सुरू असतांना बाळू सपकाळे याचा मुलगा राहूल बाळू सपकाळे याने घरातून कुऱ्हाड आणून सुधाकर सपकाळे याच्यावर वार करून जखमी केले. तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी काल शनिवारी रात्री सुधाकर सपकाळे यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता बाळू सपकाळे व त्याचा मुलगा राहूल सपकाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबर अशोक जवरे करीत आहे. 

 

Protected Content