Home क्राईम अरूण सोनवणे खून प्रकरणातील तिघा संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला

अरूण सोनवणे खून प्रकरणातील तिघा संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला

0
112


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या अरूण सोनवणे याचा तरूणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील तीन जणांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

जळगाव शहरातील समता नगरात राहणारा अरूण बळीराम सोनवणे याचा तरूणाचा १० डिसेंबर २०२३ रोजी जुन्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. यात आरोपी कुलदीप उर्फ सोनू पोपट आढाळे, पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, प्रवीण उर्फ दोध्या शिरसाठ आणि अशोक महादू राठोड हे जिल्हा कारागृहात बंदी आहेत. यातील पप्पू आढाळे, प्रवीण उर्फ दोध्या शिरसाठ, अशोक महादू राठोड, या तिघांनी जिल्हा सत्र नायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी २३ एप्रिल रोजी या अर्जावर कोर्टात कामकाज झाले. यात सदर तिघा आरोपीचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे. यात फिर्यादीतर्फे ऍड सागर चित्रे व सहाय्यक ऍड सुरेश महाजन, सरकार पक्षातर्फे एडवोकेट निलेश चौधरी. व आरोपी तर्फे एडवोकेट केतन ढाके आणि अकील इस्माईल यांनी न्यायालयात काम पहिले परंतु न्यायालयाने हा जमीन नामंजूर केलेला आहे


Protected Content

Play sound