जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील एका किराणा माल घेवून किराणा मालाचे पैसे न देता ३० हजार ४०० रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
सविस्तर माहिती अशी की, नशिराबाद शहरातील वरची अळी येथे राहणारे राकेश अशोक पाटील यांचे किराणा दुकान आहे. काल शनिवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एका कार (जीजे २७ सी ६२३०) वरील अनोळखी चालकाने ३० हजार रूपये किंमतीचा किरणा माल भरून घेतला. अनोळखी व्यक्तीने किराणा मालाच नजरचुकवून कार घेवून पळ काढला. दुकानदार राकेश पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात अनोळखी कार चालकाच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण ढाके करीत आहे.