यावलजवळील अपघाताची सखोल चौकशी करू : पोलीस निरीक्षक धनवडे

यावल, प्रतिनिधी । यावल-भुसावळ या राज्य मार्गावर यावल शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या घोडेपीर बाबांच्या दर्ग्याजवळ काल रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातामधील दोघ तरुणांचा अखेर उपचाराभावी मृत्यु झाल्याची संतप्त प्रतिक्रिया मयताच्या कुटुंबाकडुन व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान, या अपघाताची सखोलचौकशी कारु असे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सांगितले आहे.

अपघात झाल्यापासुन हे दोघे तरुण सुमारे एक ते दोन तास रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडुन होते. कुणी व्हीडीओ तयार करीत होते तर काही फोटो काढीत असतांना दिसुन येत होते. यावल ते भुसावळ या दरम्यानचा रस्ता हा १७ किलोमिटर लांबीचा असुन या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. यामुळे या मार्गावर अनेक निरपराध नागरीकांनाअपघात आपला जीव गमवावा लागला आहे. . या रस्त्याच्या दुरुस्ती करून नुतनीकरणाचे काम नुकतेच संपले असून यावलच्या सार्वजनीक बांधकाम विभागाने या मार्गावरील असलेल्या अपघात पॉईंटवर तात्काळ गतीरोधक बसवावे अशी मागणीही होत आहे. पुंडलीक चंद्रकांत सोनवणे (वय १९ वर्ष) आणि त्याचा मावसभाऊ रोशन कैलास सोनवणे ( वय १९ वर्ष) हे दोघही अपघातात मरण पावले. अपघातस्थळावर आज सकाळी यावल पोलीसांनी पंचनामा केला असुन त्यांच्या मोटर सायकलच्या दर्शनी भागाला पिवळया रंगाच्या वाहनाचे रंग लागल्याचे दिसुन आले आहे. त्यांच्या अपघातास या पिवळ्या रंगाचे वाहन कारणीभूत असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे .गावातील भुसावळ टी पाँईटवर पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी अपघाताची नोंद करून हा एखाद्या वाहनांच्या धडक दिल्याने जर हा अपघात झाला असेल तर याचा सखोल तपास लावण्याचा प्रयत्न करू असे सांगीतले .

Protected Content