भारताचे चोख प्रत्यूत्तर ; चीनचे पाच जवान ठार, ११ जखमी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लडाखमधील भारत-चीन सीमेवर सोमवारी रात्री चीनच्या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन भारतीय जवान शहीद झाले होते. भारताच्या प्रत्युत्तरातही चीनचे ५ जवान शहीद झाले असून ११ जण जखमी झाल्याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे.

 

 

चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टर वँग वेनवेन यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पिपल्स लिबरेशन आर्मीचे ५ जवान मारले गेले असून ११ जण जखमी झाले आहेत.चिनी सैन्य आणि भारतीय सैन्यामध्ये गॅल्वान खोऱ्यात सुरू असलेल्या डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत कर्नलसह दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीनचे सैनिक भारतीय हद्दीत अतिक्रमण करत होते. त्यामुळे भारत आणि चीन दरम्यान पूर्व लद्दाख जवळच्या ताबा रेषेवर गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरू आहे. मात्र सोमवारी रात्री चिनी सैन्याने पुन्हा भारतीय सैन्यावर हल्ला केला. मागे हटण्याच्या वादात गोळीबार झाला. त्यात कर्नलसह दोन जवान शहीद झाले आहेत. यानंतर आता चीनच्या बाजुने भारतीय जवानांसोबतच्या झटापटीत 5 जवान ठार तर ११ जखमी झाल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळीच परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि लष्करप्रमुख नरवणे यांची बैठक बोलावली होती. दरम्यान, प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतरही चकमक झाल्यामुळे सीमेवर प्रचंड तणाव वाढला आहे.

Protected Content