लव्ह जिहाद कायद्याखाली उत्तरप्रदेशात पहिला गुन्हा दाखल

लखनऊ वृत्तसंस्था । युपी सरकारने वादग्रस्त लव्ह जिहाद कायदा लागू केल्यानंतर काही तासांमध्येच बरेली येथे या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन यांनी शनिवारी लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या अध्यादेशाला मान्यता दिली. यामुळे फक्त विवाहासाठी मुलीचा धर्म बदलल्यास असे विवाह अवैध ठरविण्यात आले असून धर्मांतर करणार्‍यांना दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या अध्यादेशानुसार उत्तर प्रदेशात बळजबरीने, खोटे बोलणे, लोभ किंवा इतर कोणत्याही कपटपूर्ण मार्गाने किंवा लग्नात रूपांतरण करणे हे अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आले आहे.

दरम्यान, युपीमध्ये लव्ह जिहादचा कायदा अंमलात येऊन काही तास उलटत नाही तोच याच्या अंतर्गत बरेली येथे पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बरेली शहराजवळच्या देवरानिया भागात धर्मांतर करण्यासाठी दबाव येत आहे. तिच्या कुटुंबियांनाही धमकावले जात आहे. आरोपीने मुलीला अनेक मार्गांनी आमिष दाखविल्याची तक्रार करण्यात आली आहे. या गावात राहणारा रफिक अहमद याचा मुलगा उवैस अहमद याने एका तरूणीशी परिचय वाढवून तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. जबरदस्तीने धर्मांतर करण्यास विरोध केल्याने आरोपी उवैस अहमदने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप आहे. लव्ह जिहादवरील कायदा लागू झाल्यानंतर देवरानिया पोलिस ठाण्यात पहिला निषेध प्रतिबंधक कायदा ३/५ कलम ३ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

Protected Content