जळगावात निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । पोलीस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या अधिकारी निवासस्थानाच्या मुख्य गेटजवळ ४० वर्षीय निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. उगले यांनी भेट देवून पाहणी केली.

याबाबत माहिती अशी की, पोलीस कर्मचारी गोपाल रामचंद्र सोनवणे (वय-४०) रा. पोलीस वसाहत यांचा मृतदेह पोलीस मुख्यालयाच्या बाजुला असलेल्या आधिकारी निवासस्थानाच्या मुख्य गेटजवळ आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास आढळून आला. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस सेवेतून ते निलंबित होते. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास अधिकारी निवासस्थानाच्या आवारात असलेल्या शौचालयाच्या चेंबरवर बेशुध्दावस्थेत आढळून आले. एकाने त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला. शुध्दीवर आल्यानंतर ते मेन गेटकडे चालत गेले असता खाली पडून त्याचा अकस्मात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पटेल सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे पंचनामा करून जिल्हा रूग्णालयात रवाना केला आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली.

पोलीस मुख्यालयाच्या बाजूला मृतदेह आढळून आल्याने पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट घेतली.

Protected Content