आंबेवडगावजवळ रिक्षाची दुचाकीला धडक; दोन जखमी

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील आंबेवडगावजवळ एका मालवाहू रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाचोरा-जामनेर रस्त्यावर आंबेवडगाव येथील मोबाईल टॉवर जवळ मालवाहतूक गाडी ला मोटर सायकलची समोरासमोर जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल चालक व रिक्षा चालक हे दोघेही गंभीर जखमी झाले असून फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content