वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार बाळासाहेबांची शिवसेना शिंदे रात गटामध्ये गेले असले तरी देखील उद्धव ठाकरे शिवसेनेची पकड अजूनही जळगाव जिल्ह्यात मजबूत होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील अक्सा नगर मुस्लिम मोहल्यात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार फुटून शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाची बाजू कमकुवत झाल्याचे बोलले जात होते, परंतु जरी पाच आमदार शिंदे गटात सामील झाले असले तरी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे लोकांचा कल असल्याचे दिसून येत आहेत.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील अक्सा नगर येथील मुस्लिम समाजातील नागरिक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये सामील होत भुसावळ तालुका शिवसेना संपर्कप्रमुख सुरेश राणे यांच्या हस्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख समाधान महाजन शहराध्यक्ष संतोष माळी यांच्यासह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.