नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपावला आहे. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी आतिशी असणार आहेत. आतिशी यांच्यासह सर्व मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित होते.
दिल्ली सरकारने 26 आणि 27 सप्टेंबरला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. त्या देखील यावेळी केजरीवालांसोबत होत्या. दिल्ली च्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल तीन वेळेस मुख्यमंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रासोबतच दिल्लीत निवडणूका घेण्याचे आव्हान दिले आहे.