आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा शुभारंभ

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात केली.

दिवाळी सण हा सर्वांचा गोड व आनंददायी जावा याकरिता राज्य शासनाने आनंदाचा शिधा म्हणून धान्य दुकानांवर केवळ शंभर रुपयात चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य या निर्णयामुळे जनसामान्य नागरिकांची दिवाळी ही गोड व आनंददायी व्हावी याकरिता आनंदाचा शिधा म्हणजे केवळ शंभर रुपयांमध्ये १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या चार वस्तू रेशनिंग दुकानावरून उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच राज्य शासनानेेेे मंजूर करून दिले . आमदार चंद्रकांंत पाटील यांनी या वाटपाचा शुभारंभ केला. दरम्यान, मतदारसंघातील मुक्ताईनगर तालुक्यातील दहा तर शहरातील सहा धान्य दुकानांवर तर बोदवड येथील १३ तसेच रावेर भागातील २२ सदरील किट उपलब्ध आहे तर येत्या एक ते दोन दिवसात मतदारसंघातील प्रत्येक रेशन धान्य दुकानांवर हे किट उपलब्ध होणार आहे.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शहर प्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक निलेश शिरसाठ, संतोष मराठे, राजेंद्र्र हिवराळे, संतोष कोळी, दिलीप पाटील वसंता भलभले, बबलू कोळी, सलीम खान, पियुष महाजन, निलेश शिरसाठ, अनस खान, महिंद्र मोंढाळे, संतोष माळी, शुभम शर्मा, नंदू मराठे, राजू तळेले आदींसह शिवसैनिक व शिधा लाभार्थी होते.

Protected Content