जळगाव, प्रतिनिधी । अंजनी धरण येथील कार्यरत सुरक्षा रक्षकांना आजपर्यंत सुरक्षा रक्षक मंडळात घेण्यात आलेले नसून त्यांना त्वरित नियुक्ती द्यावी याप्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी गार्ड अॅण्ड जनरल वर्क्स युनियन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
अंजनी धरण येथील कार्यरत सुरक्षारक्षकांना आजपर्यंत सुरक्षा रक्षक मंडळात घेण्यात आलेले नाही. तशी शिफारस देण्यास संबधित अधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून टाळाटाळ करीत आहेत. तसेच वाघुर धरणावरील कार्यरत सुरक्षा रक्षकांना डवलुन प्रतिक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना बेकायदेशीरपणे नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्या नियुक्त्या रद्द करून अनुभवी व काम केलेल्या सुरक्षा रक्षकांना त्वरित नियुक्त्या देण्यात याव्यात. तसेच गेल्या सहा महिन्यान पासून अंजनी धरणावरील सुरक्षा रक्षक विनावेतन काम करीत आहे. त्यांना वेतन त्वरित मिळावे, या मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. उपोषणात संघटनेचे अध्यक्ष सोमा कढरे, सरचिटणीस गौतम पाटवे, प्रदेश संपर्क प्रमुख पूनमचंद्र निकम, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सूरसिंग पाटील, सचिव किशोर मेढे सहभागी झाले आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/987527861982521