साकळीच्या “जलकुंभ’ बांधकामावर नागरिकांची हरकत

यावल- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी गावातील ओपन स्पेस जागेवर “जलकुंभ’च्या बांधकामांवर नागरिकांनी हरकती घेतल्या असून त्वरित सदर बांधकाम थांबविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिले आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, साकळी गावातील रेखा नगर या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी यावलच्या गटविकास अधिकारी डॉ . मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) आणि ग्रामीण पाणीपुरवठा चे अभियंता पी. बी. देसले यांच्याकडे लिखित तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मौजे साकळी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गट क्रमांक सात या ठिकाणी रेखा नगर वस्ती आहे. या ठिकाणी वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी धार्मिक विधी , विवाह कार्यक्रम आणि विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी ग्रामस्थांच्यासाठी त्यांच्या हक्काचे खुले भुखंड (ओपन स्पेस ) सोडण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायतीने या ठिकाणी राहणाऱ्यांची कोणतीही संम्मती न घेता बेकायद्याशीर ठराव मंजुर करून पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ बांधण्याच्या तयारीत आहे. या रेखा नगरच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांची या जलकुंभाच्या कामावर हरकत घेतली आहे. पंचायत समिती प्रशासनाने व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तात्काळ हे जलकुंभाचे होणारे काम थांबवावे अशी तक्रार केली आहे .

सदर निवेदनावर शांताराम माळी , अक्षय पाटील , प्रल्हाद वाघळे , अशोक महाजन , शामराव कोळी , नंदु माळी, किशोर शिरसाडे , जितेंद्र पाटील , अमीत कोळी , वसंत मराठे, ईश्वर लोधी , अशोक पाटील , किरण कोळी, सुपड्र महाजन, अर्जुन पाटील , मंगला महाजन , सतिष न्हावी , सुनिता शिरसाडे , निकीता माळी , संध्या सोनवणे , निलीमा महाजन , उषाबाई तेली, मनिषा न्हावी, ज्योती माळी , कमल सोनवणे , रंजना पाटील , रेखा चौधरी , सिमा महाजन , देवीदास पाटील आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

तत्पूर्वी साकळीच्या नियोजीत जलकुंभाच्या ठिकाणी मंदीर आहे. त्या मंदीरास तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत असुन तसे झाल्यास शिवसेना सहन करणार नाही, अशा प्रकारच्या गोंधळलेल्या जलकुंभाचे बांधकाम त्वरीत थांबवावे अशी भुमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे यावल शहर उपप्रमुख संतोष खर्च, सांगरधर बेहेहे, पप्पु जोशी यांच्यासह शिवसेना ( ठाकरे गटाने ) यांनी स्पष्ट केली आहे. तसेच ग्रामस्थांच्या या मागणीला पाठींबा दिला आहे. या जलकुंभाचे बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्यास लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखील देण्यात आले आहे.

Protected Content