गौणखनिज तस्करांचा झोल : एकाच क्रमांकाचे दोन डंपर जप्त !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महसूल प्रशासनाने एकाच क्रमांकाची दोन वाहने गौणखनिज तस्करी करत असल्याचे शोधून ते जप्त करण्याची कारवाई केली आहे.

यावल तालुक्यात महसुल प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी विनापरवाना गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. महसुलच्या या कारवाईमुळे वाळु माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे . यावल तालुक्यातील मौजे कासवे येथील एका बंद पडलेल्या स्टोन क्रेशर ठिकाणी यावल च्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ व महसुल च्या बामणोद विभागाच्या मंडळ अधिकारी सौ बबीता चौधरी , अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी यांच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईत दोन समान क्रमांक असलेले मोटर वाहन ( डंपर ) कारवाई करीत पकडण्यात आलेले असुन सदरचे दोघ ही डंपर पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आलेले आहेत. तसेच कासवे येथील तापी नदी पात्रा जवळ१० ब्रास वाळुचा साठा देखील जप्त करून फैजपुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला आहे.

यावल मागील काळात महसुल प्रशासना च्या वतीने कारवाई करीत अवैद्य गौणखनिज ची विनापरवाना वाहतुक करणार्‍या वाहनांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असुन असे वाहनांच्या मालकांनी अद्यापपावेतो आकारण्यात येणारी दंडाची रक्कम भरलेली नाही अशा वाहनांच्या लिलाव करण्याबाबत चा प्रस्ताव प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतले जाणार असल्याचे महसुल प्रशासनाच्या सुत्रांकड्डन कळविण्यात आले आहे.

Protected Content