यावल येथे भाजपातर्फे वीजबिल होळी आंदोलन

यावल प्रतिनिधी । गेल्या सहा महिन्यांपासून नागरीकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आता महविकास आघाडी सरकारने विजबिल माफ न केल्याने यावल तालुका भाजपातर्फे विजबिल होळी आंदोलन करण्यात आले.

शहरातील कृउबा समितीच्या समोर महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , माजी तालुका अध्यक्ष डॉ. नरेन्द्र कोल्हे , कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, कृउबाचे संचालक व राकेश फेगडे, कृउबाच्या संचालीका कांचन फालक, जि.प. सदस्या  सविता भालेराव , यावलचे नगरसेवक डॉ  कुंदन फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, किशोर कुलकर्णी, खरेदी विक्री संघाचे संचालक गणेश गिरधर नेहते , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, पुरूजीत चौधरी,  विलास चौधरी यांच्यासह पक्षाच्या विविध विभागातील  पदाधिकारी यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. या आंदोलनात भाजपाच्या वतीने विज बिलांची होळी करून  शासन विरोधात घोषणा देण्यात आल्यात.

Protected Content