संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयात योग दिन साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिना निमित्त योगासनाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.

 

यावेळी शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मोठी उपस्थिती होती.  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन. डी.काटे यांनी योगा व प्राणायामाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. शाळेतील उपशिक्षक एस. एस. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना योगा व प्राणायाम चे प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थ्यांकडून योगा व प्राणायाम करून घेतले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content