मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयातील सुविधांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

मुक्ताईनगर  । पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज मुक्ताईनगर तालुका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर होत असलेल्या उपचारांची माहिती आरोग्य यंत्रणेकडे घेतली.  

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार चंद्रकांत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर रुग्णांवर आवश्यक ते उपचार  शासकीय रुग्णालयातच उपलब्ध होतील याचे नियोजन यंत्रणेने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Protected Content