मू.जे.च्या दोन छात्र सैनिकांची प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

asdd

जळगाव, प्रतिनिधी | येथील मूळजी जेठा महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) युनिट मधील दोन छात्र सैनिक ज्युनिअर अंडर ऑफिसर तेजेश पाटील आणि ज्युनिअर अंडर ऑफिसर सुनीता खिलेरी यांची दरवर्षी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड समारंभासाठी निवड झाली आहे.

 

या परेडमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीत मू.जे. महाविद्यालयाच्या स्थापनेस यंदा ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या वर्षी महाविद्यालय अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यंदाचे हे यश जणू दैदिप्यमान करणारे आहे. कारण या वर्षी एकूण सात छात्र सैनिकांनी राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे.

१९९१ पासूनच्या रेकॉर्डनुसार आतापर्यंत ७२ सिनिअर डिविजन आणि २८ सिनिअर विंग असे एकूण १०० छात्र सैनिकांनी आपले राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दिल्ली येथील शिबिरात आपले स्थान कायम ठेऊन संस्थेची परंपरा कायम ठेवली आहे. या विशेष कामगिरी बाबत उत्तुंग यशाबद्दल के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी छात्र सैनिकांचे विशेष कौतुक केले आहे.

याच वर्षी दिल्ली येथे झालेल्या थळ सेना शिबिरात सिनिअर अंडर ऑफिसर मोहित सपकाळे (सुवर्ण पदक-मँप रीडिंग), ज्युनिअर अंडर ऑफिसर विजय पोस्टे (रजत पदक-हेल्थ अंड हाइजीन), आणि ज्युनिअर अंडर ऑफिसर दर्शना काकडे (रजत पदक-फायरिंग).

तसेच जी.व्ही. मावळणकर शूटिंग स्पर्धेत जेयूओ सृष्टी सचिन भावसार हिने आसनसोल (पश्चिम बंगाल) येथे झालेल्या इंटर डायरेक्टरेट शूटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर जी.व्ही. मावळणकर स्पर्धेचे मुलींमधील सुवर्णपदक मिळविले. तसेच याच स्पर्धा शृंखलेत जेयुओ रोहित माळी यानेही मुलांमध्ये ०५ व्या क्रमांकावर छात्र सैनिकांनी पदक मिळवून युनिट तसेच बटालियनचे नाव अग्रस्थानी ठेवले होते.

या १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर व त्यांचे प्रशिक्षक सहकारी तसेच एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट डॉ.बी.एन. केसुर, लेफ्ट डॉ. योगेश बोरसे यांचे मोलाचे मार्गदर्शन या छात्र सैनिकांना लाभले आहे.

Protected Content