‘रावेर पीपल्स’च्या चेअरमनपदी महाजन, कुलकर्णी व्हाईस चेअरमन !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पिपल्स को-ऑपरेटीव बँकेच्या चेअरमनपदी प्रल्हाद महाजन यांची तर व्हाईस चेअरमनपदी मानस कुलकर्णी यांची आज एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

अलीकडेच रावेर पिपल्स को-ऑपरेटीव बँकेची निवडणून पार पडली होती. यानंतर आज बँकेच्या  हॉल मध्ये विशेष सभा बोलवण्यात आली होती. यामध्ये चेअरमन पदासाठी प्रल्हाद महाजन तर व्हाईस चेअरमनपदी मानस कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपताच चेअरमन,व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

 

यावेळी सभेला राजेंद्र चौधरी, पंकज पाटील, सोपान पाटील, सोपान साहेबराव पाटील, संजय वाणी, राजेश  शिंदे, पुष्पाबाई  महाजन, मिराबाई  राऊत, दिलीप पाटील, अँड.प्रविण  पाचपोहे, विनोद तायडे, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी,  सुधाकर महाजन, शिरिष वाणी, मिलिंद अवसरमल, उमेश महाजन, देविदास शिंदे, मोहन महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, श्रीराम महाजन, महेश लोखंडे, तुषार मानकर आदींची उपस्थिती होती.

 

चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदांची बिनविरोधी निवड जाहीर होताच जोरदार आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

Protected Content