जळगाव, प्रतिनिधी । औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचा खेळाडू मानव चंद्रकांत भोसले यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे दि. ७ ते १० जानेवारी दरम्यान महाराष्ट्र एअर गन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
कोरोनामुळे प्रत्येक खेळाडूमध्ये ६ फुटाचे अंतर ठेवून या स्पर्धा होणार असल्याने एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये यासाठी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पनवेल आणि पुणे अशा ठिकाणी या स्पर्धा घेण्यात येत आहे. सर्व खेळाडू आपापल्या जवळच्या भागातील रेंजवर या स्पर्धेत सहभागी होतील आणि सर्व निकाल मुंबई येथे आल्यानंतर मेरीट प्रमाणे रिझल्ट लागणार आहेत. औरंगाबाद येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी मानव चंद्रकांत भोसले हा पॉईंट.१७७ पिप साईट एअर रायफल१० मीटर पुरुष गटातील कुमार व वरिष्ठ गटात सहभागी होत आहे. मानव यांचे वडील जळगाव चिंचोली येथे माजी सैनिक असून त्यांचे व संपूर्ण परिवाराचे त्यास प्रोत्साहन मिळत आहे. मानव यास संस्थेचे मुख्य प्रशिक्षक व सचिव दिलीप गवळी व प्रशिक्षक निलेश जगताप यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे. निलेश याची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बिशल मिलवाणी, प्राध्यापक यशवंत सैदाणे, सुनील पालवे, विलास जुनागडे,डी. ओ. चौधरी, दिनकर जेऊरकर यांनी अभिनंदन केले आहे.