डाटा चोरी गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयीन कोठडी

जळगाव प्रतिनिधी | बंॅक खात्यांची माहिती चोरुन ४१२ कोटींवर ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शनचा डाव आखलेल्या टोळीतील ६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

कोट्यवधींची रक्कम असलेल्या खातेदारांचा डाटा चोरी करुन हॅकर मनीष भंगाळेला पाठवण्यात आला होता. त्याच्या माध्यमातून ४१२ कोटींवर ऑनलाईन फसवणूक करण्याचा या टोळीचा डाव होता. या प्रकरणात जळगावातील हेमंत पाटील व धुळे येथील मोहसीन खान ईस्माईल खान, युनियन बँकेचा बडतर्फ व्यवस्थापक रवींद्र मनोहर भडांगे (वय ४९, रा. जेलरोड, नाशिक), भारत अशोक खेडकर (वय ४७, रा. नाशिक), दीपक चंद्रसिंग राजपूत (वय ४६, रा. पंचवटी नाशिक) व जयेश मणिलाल पटेल (रा. चिखली गुजरात) याना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली होती.

त्यांना पोलिस कोठडी मिळाली होती. शुक्रवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content