डॉ. पायल आत्महत्या प्रकरण ; दोषींवर कडक कारवाईसाठी काँग्रेसतर्फे मोर्चा (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 05 30 at 6.13.29 PM

जळगाव (प्रतिनिधी )  डॉ. पायल तडवी यांना त्यांचे वरिष्ठ सहकारी डॉक्टर यांनी केलेल्या रॅगिंगमुळे जीव गमवावा लागला असून याप्रकरणात आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर अॅट्रासिटी व रॅगिंग विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जिल्हा महानगर व ग्रामीण कॉग्रेस कमिटीने करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला.

 

या मोर्चात जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी आध्यक्ष ऍड. संदीप पाटील, जळगाव जिल्हा महानगर काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदेश काँग्रेस कमिटी सिरचिटणीस शिरीष चौधरी, चिटणीस डी . जी. पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे, सुरेश पाटील, अजबराव पाटील, गणेश पाटील, भगतसिंग पाटील, विष्णू घोडेस्वार , अविनाश भालेराव, श्रीधर चौधरी, आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त व आदिवासी बांधवानी सहभाग घेतला होता.जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाकऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात डॉ.पायल तडवी यांची आत्महत्या संशयास्पद असुन पुरावे नष्ट करण्याचेही प्रयत्न करण्यात आलेलेआहेत असा खळबळजनक आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. डॉ. पायल यांच्या आत्महत्येला आठवडा होत  आला तरी अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही . तरी डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर अॅट्रासिटी व रॅगिंग विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करून काँग्रेसतर्फे डॉ. पायल यांच्या नातेवाईकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content